जिवाभावानं सेवा तुझी घडू दे हो !

( चाल : गड्या ! भावानं भक्तिनं . . ) 
जिवाभावानं सेवा तुझी घडू दे हो ! ॥ धृ० ॥ 
मोठ चंचल मन , फिरे विषयी - रान , नाही समाधान ।
देह संताचिया पायी   पडु   दे   हो ! । । १ । । 
लोभ अनावर , क्रोध खातो शिर , नाही हृदया धीर ।
चित्त तुझ्या ध्यानी सदा गदु दे   हो ! । । २ । ।
हेचि राहो ध्यान , तुझ्या रंगी मन , जावो अंती प्राण ।
दास तुकड्या म्हणे चित्त जडु दे हो ! । । ३ । ।
        - हिंगोली , दि . ०५ - ०७ - १९५४