अरे ! दूर चला निघुनी इथुनी

( चाल : दो दिनके लिये मेहमान . . . ) 
अरे ! दूर चला निघुनी इथुनी, मज एकटियासी काम असे ।
का चंचलता करुनी असली, फसवाल मला जणु चोर जसे ।। धृ०॥ 
हे काम बघा , अणि क्रोध बघा, मद लोभ अणि हा मोह बघा ।
घिरट्या करिती भवती सहसा, म्हणुनी न मिळे प्रभुराज कसे ।।१।। 
ममता , कटुता आणि इंद्रिय हे , अति मोहवुनी मज घेरविती ।
दिसु द्या प्रभुला जा दूर तरी , तुकड्या म्हणे त्याविण चैन नसे ।। २।।
        हैद्राबाद , दि . १४ - ०१ - १९५५