सांगाल कुणी चंचल मन हे
( चाल : हे री मै तो प्रेमदिवानी . . . )
सांगाल कुणी चंचल मन हे , स्थीर कसे होणार ? ॥ धृ० ॥
काय करावे साधन यासी ? कैसे होईल पार ?
त्याविण नाही शांति जिवाला , चैन क्षणहि नसणार ।। १ ।।
किती करावे जपतप यास्तव?न तुतो प्रभुचा तार ।
निजरुप हे मन विसरुनी जाते , करुनी विषय - आहार ।। २ ।। शरण कुणाला जावे यास्तव ? देईल कोण अधार ।
तुकड्यादास उदासचि झाला , पावुनि शेवटि हार ।। ३ ।।
- निजामाबाद , दि . १७ - ०५ - १९५५