विटे कोमल पाऊले I

विटे कोमल पाउले । कर कटेवरी ठेविले ॥
गळा नवरत्न हार  I हिरे जडाव पाचोर  ॥
कानी कुंडल मकराकर । सुवर्ण मुकुटाचा भार ॥
तुकड्या म्हणे माझा हरि । धनिक कुबेराच्या वरी ॥