शिव पार्वतिला बोलूनि गेला अमरपुरीची कथा

( चाल : पंढरीनाथा ! झडकारि . . . )
शिव पार्वतिला बोलूनि गेला अमरपुरीची कथा । 
योगिजन तन्मय होती सदा ।। धृ० ॥ 
कुंडलिनी जंव जागृत करुनी , ऊर्ध्व दृष्टि अंतरी वळवुनी ।
सत्रावीचा अमृतसाठा , भ्रमरगुंफेचा धरि वरवंठा । 
ब्रह्मांडी मग पोहचवि प्राणा , लावि समाधी त्या निजस्थाना । समभावाने अखंड निजरुप, भोगित योगी उन्मनि सुखदा॥१॥
मानव जंव हे निजरुप साधी , अखंड भोगी सहज - समाधी ।
विश्वरुपाचे दर्शन करुनी , सदा करी व्यवहारहि ज्ञानी ।
राज्यपदाला प्रारब्धाने , भोगुनि राही हा निजज्ञाने ।
तुकड्यादास म्हणे या वचना, विसरु नका हे सांगा सुजना॥२॥
           - सेवाश्रम - वडी , दि . २० - ११ - १९५४