राहते वृत्ति ही अति बरी, या इथे मंदिरी

( चाल : माझिया प्रियेचे . . ) 
राहते वृत्ति ही अति बरी , या इथे मंदिरी । । धृ । । 
सुंदर वन भोवताल , उंच वृक्ष अति विशाल । 
पुष्पांचा पडत सडा , परिजातक -   परिसरी । राहते ॥ १ ॥ 
चंदन , मधु , बिल्वपत्र , जाइजुई बकुळ - सत्र । 
रातराणि , मदनमस्त , खस , गुलाब , मोगरी । राहते ।। २ ।। मध्य प्रार्थनीय चौक सुंदर जै बसती लोक ।
आसनी निरांजनी ही ,   धूप    देत    माधुरी । राहते ।। ३ ।। 
मधुर मधूर गीत गात , मन रमे अती निवांत ।
तुकड्या म्हणे प्रार्थनेत , अंत होऊ  दे   हरी ! । राहते ।। ४ ।। 
         - वरोरा , दि . २६ - ०९ - १९५४