तुझ्या मंदिरी रीघ ही सेवकांची
( चाल : तेरें सहारे सुधर . . )
तुझ्या मंदिरी रीघ ही सेवकांची, अशांती न राहे तिळही मनाची ।। धृ ।।
सदा प्रार्थना ध्यान गंभीर राहे , कधीही बघो स्वच्छताची स्वभावे ।
ध्यानी भावना वाहते ही सुखाची । अशांती न राहे ॥ १ ॥
किती रम्य हे स्थान या प्रार्थनेचे, सुगंधे हरी भानची या जिवाचे ।
असे वाटते तीर्थ हे सर्व काशी । अशांती न राहे ।l २ ।।
लतापुष्प भवती महावृक्ष पाणी,सदा खेळती बालके,बाळि ज्ञानी ।
अति नम्रता बोलण्या - वागण्याची । अशांती न राहे ॥ ३ ॥
इथे संत साधूची प्रतिमा बघावी , पहावे तिथे संत सन्मार्ग दावी ।
म्हणे दास तुकड्या घडी ती सुखाची । अशांती न राहे0 ॥ ४ ॥
- परभणी , दि . १३ - ०१ - १९५५