विश्राम साठवाया, आनंद झोपडीचा
(चाल: आनंद कंद ऐसा..)
विश्राम साठवाया, आनंद झोपडीचा
स्वातच्य चात माझे, चित. आसरा सुखाचा |।धृ ०।।
नच नौकरी कुणाची, नच लालसा धनाची |
नच “चाड चासनेची, नच जासही जनाचा 1१ ॥|
असले तसे असावे, मानोनि
धन्य व्हावे;
तनुत्रास सोसुनीया, धरि भाव अंतरीचा ।।२ ।।
नच कर्म-काम काही, अवरोध-रोध नाही|
निष्काम मार्ग दाही, नच भासही दुखाचा ।।३॥।
भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे ।
स्वानंदि झोप घ्यावे, हा नेम निश्चयेचा||४॥।।
नच मागणी कुणाला, नित बोधवी मनाला |
दमनात दीन गेला, शम वासनादिकांचा ।।५।।
कवणाविरूध्द नाही, अपमान मान नाही|
इच्छा जिवंत नाही, नच बंध कामिकेचा||६।।
कांत आचरावा, प्रेमा मनी धरावा]
निजनयन पाजळावा, जो भाव योगियांचा ।1७॥।
नच आस बांधवांची, नच कामिनीहि जाची ।
मग टाळि का यमाची? नच भार साधनाचा ।1८।।
मृत्यूसमीप व्हावे, मेलेपणी रहावे
मरूनी जिवंत व्हावे, नच धाकही रणाचा |।९॥।
जाणोनि जीवभावा, अपरोक्ष शोध घ्यावा।
धरुनी क्षमा स्मरावा, स्वानंद अंबरीचा|।१०॥।
चित्तास स्थीरवावे, स्थिरवबोनि मोन व्हावे |
जो जे तसे रहावे , हा वाद निश््चयेचा।।२१२॥।
तुकड्यास ठाव द्यावा, ऐसा भरा पुरावा |
मतभेद तो हरावा, निज प्रेम-साम्यतेचा ।।१२॥।