तरूणांचे बाहुबल हे असते देश रक्षणा

(चाल: वनवासी राम माझा...)
तरूणांचे बाहुबल हे असते देश रक्षणा ।।धृ0।।
कोणि ना छळो कोणाला, हीन-दीन अणि गरिबाला ।
सारखीच बाला - अबला, सौख्य   जीवना ।।१।।
आपुलेपणी विहरावे, कष्ट करुनि फळ भोगावे ।
हाच     दिधला    देवे,   सकळ     सजना ।।२।।
कोणि नसे छोटा-मोठा, का कुणास व्हावा ताठा ?
राष्ट्र जगविण्या दिन कंठा, धरुनि सद्गुणा ।।३।।
बुध्दि-विकासाची थोरी, तोचि होतसे अधिकारी ।
राष्ट्रकार्य करुनी सुखवी  सकल   सज्जना ।।४।।
सर्व हे सुखाने व्हावे, इच्छितसे देव स्वभावे ।
दास सांगतो तुकड्या   हे,  आठवा    मना ।।५।।