सोड रे सोड दारुला, ओळखी
(चालः तू येशील केव्हातरी..)
सोड रे सोड दारुला, ओळखी अपुल्या माणुसकिला ॥धृ०।।
दारुच्या पायि कितितरी, जाहले नष्ट भूवरी ।
तूहि त्या मार्गि लागला, ओळखी अपुल्या माणुसकिला ॥१॥
नच मान-पान राहते, हसतात लोक भोवते ।
म्हणतात बघा हो भला ! ओळखी अपुल्या माणुसकिला।।२।।
घरी मुले-बाळेही तसे बनतात दारुने पिसे ।
कुलधर्म नाश पावला, ओळखी अपुल्या माणुसकिला ॥३॥
तुकड्याची ऐक बातमी, कर दारुपिणे हे कमी ।
शुरवीर होई चांगला, ओळखी अपुल्या माणुसकिला ॥४॥