वृत्ती झलीसे उदास

वृत्ती झालीसे उदास । नाही धैर्य गा ! मनास ।।
प्रपंचही तो सुटला । परमार्थासी पडला घाला ।।
वाटे कुठे नाही थडी । म्हणूनी चरणाची तातडी ॥
बुडलो बुडलो धाव आता । तारी आडकुजी समर्था ! ।।