सर्व ज्ञाते सर्व ठावे

सर्वज्ञाते सर्व ठावे । तेथे काय ते सांगावे ? ।।
मी तो पामर अंकित । माझा पाहसी का अंत ? ।।
ब्रीद तुझे जाईल वाया । नाही तरी तारी राया ! ।।
तुकड्या म्हणे ऐसे करा । चरणी ठेवा हो दातारा ! ।।