श्री गुरु आडकोजी ! निज चरणी मला घ्या हो

(चाल- गुरुनाथ निरंजन हो.)
श्रीगुरु आडकोजी ! निज चरणी मला घ्या हो ! ।
दारिद्र्ये पिडलो मी, का दास उपेक्षा हो ? ॥
आवडे तुम्हा ऐसी, ही निष्ठरता का हो ? ।
तोडोनी भ्रम सारा, तत् पदी नाचवा हो ! ॥१॥
सांगति श्रुती महिमा, गुरु देवाही पार ।
नेति-नेती बोल जिथे, मग माझा का भार ? ॥
परि तुम्ही लक्ष ठेवा, साठवा की संसार ।
ब्रीदासी शून्य घाला, वाढवा   की   डंभर ॥२॥
श्रीगुरु सखा माझा, असशील पूर्ण तू गा ! ।
कासया करू चिंता, मग मीच कशाची गा ? ॥
पण मला कृपा देई, मागणे हेचि दे गा! ।
बा ! कंठ दाटलासे, की प्राण चालले  गा ! ॥३॥
वरखेड गावी त्राता !, मांडले स्थान कैसे ।
भक्तासि पाळितो गा !, का हाचि तुला न दिसे ? ॥
बैसला स्वये तेथे, कौतुक हे पाहतसे ।
तुकड्यास ठाव देई, मागणे   तुला   ऐसे ।।४।l