सखा स्वामी माझा गुरुराजा देव

सखा स्वामी माझा गुरुराजा देव । पाहे शुद्ध भाव भक्ताअंगी॥
कैसी भक्ती करी, कैसी श्रद्धा ठेवी । तैसा धावे धावी माझिया तो ॥
उदार गंभीर झाला जव भक्त । अद्वैती विभक्त न ठेविती ॥
म्हणे तुकड्यादास गुरु-शिष्यपण । स्वरूप धारण होता फिटे॥