ऐशा कोण्या पूण्ये यांचा मी सेवक ?
ऐशा कोण्या पुण्ये यांचा मी सेवक ? । द्वैतभाव एक झाला असे ॥
ऐसा गुरु मज दिला रामराया । ते थोरी जगा या सांगू किती ? ॥
बहू हो गहन संत - भेटी आहे । दावियले पाय आडकोजी ! ॥
तुकड्यादास म्हणे बोलू काय आता ? । ठेवी चरणी माथा सद्गुरुच्या ॥