तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संतसंगे माझे मन आकळले
संतसंगे माझे मन आकळले । तेही मी लावले गुरुचरणी ॥
वैराग्याचा बोध झाला माझा मज । म्हणोनी सहज आनंदलो ॥
श्रीसद्गुरुराया ! करी कृपा आता । सत्य पंथ त्राता! दावी मज ॥
म्हणे तुकड्यादास अहंकार झाला । चरणी दाबला श्रीगुरुने ॥