जन नाशिवंत सुख ते मागती

जन नाशिवंत सुख ते मागती l  पुढे दोघे जाती नर्कवासी ॥
म्हणे हो बावाजी ! घ्या घ्या ही दक्षिणा । एक पुत्रराणा द्यावा त्वरे ॥
वासनांचा क्षय ज्याचे नाही झाला । ऐसिया साधूला शरण जाती ॥
तुकड्या म्हणे दोघा घालावे चुलीत । मायिक संपत नको त्यांची ll