तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुखाचीये साठी धरिती चरण
सुखाचिये साठी धरिती चरण । दोघेही चालून नर्की जाती ॥
अहो ! याची स्थिती नाही झाली पूर्ण । वैराग्य बा ज्ञान झाले नाही ॥
पढतमूर्खाचे घेऊनी लक्षण । सांगे शहाणपण लोका बहू ॥
तुकड्यादास म्हणे दक्षिणा मागती । प्रपंचात खाती सुखासनी ॥