लावोनिया भस्म लंगोटी घालिती
लावोनिया भस्म लंगोटी घालिती । कपीमध्ये जाती मरावया ॥
घालोनी खडावा माळ भद्राक्षाची । तमाशात नाची आनंदाने ॥
घेवोनी भोपळा वस्त्र ते भगवे । श्वानासी गाढवे सिंह केले ॥
होईना प्रपंच नपुंसक झाले । मन ते राहिले विषयात ।।
म्हणे तो सद्गुरु मीच झालो आता । खातो पुढे लाता यमाघरी ॥
तुकड्यादास म्हणे सांगू कोणा काय ? । म्हणताति माय काढी त्वरे ॥