जगी प्रेमसुख वाटतसे फार

जगी प्रेमसुख वाटतसे फार । म्हणोनी सुंदर साधू झाला ॥
वैराग्य ते काही नसे अंगी पाही । बोध पुरा नाही सद्गुरुचा ॥
की उपदेश पोटाच्या कारणे । अंगी घाली लेणे गोसाव्याचे ॥
म्हणे तो तुकड्या कैसा झाला साधू ? । लागेल रे ! बाघू यमाघरी ॥