जरी झाला शुद्ध जातीचा ब्राह्मण

जरी झाला शुद्ध जातीचा ब्राह्मण । तरी संध्यास्नान सोडावे का ? ॥
सांगे संत-सखा स्वामी तुकाराम । जेथे नाही प्रेम संत तो का ? ॥
बोलताति वेदश्रृती नेति - नेति । वाढविली मती नलगे अंत ॥
म्हणे तुकड्यादास नाही ब्रह्माभ्यास । सांगतो जगास ज्योति दावू ।