वाचोनिया शास्त्र बहू l म्हणी ज्योती आम्ही दाऊ

वाचोनिया शास्त्रे बहू । म्हणे ज्योति आम्ही दावू ॥
अहंकार मुरला  नाही । ज्योति यमाघरी पाही ॥
ज्योति पाहायासी गेले । ते का पुन्हा परतले ? ॥
तुकड्यादास म्हणे शुद्ध । तेथे कशाचे अशुद्ध ॥