सांगती पुराने पोपटाची वाणी

सांगती पुराणे पोपटाची वाणी । अनुभव घेवोनी कोण बोले ? ॥
निंदितो लोकांसी नर जो का ऐसा । पुढे त्यासी खासा यम ओढी ॥
आपण ही निंदी लोकांते निंदवी । कासया प्रसवी माय त्याची ? ॥
म्हणे तुकड्यादास शिष्य-सेवा घेणे । यमाघरी जाणे भोजनासी ॥