सांगाया पुराण वाटतसे सोपे
सांगाया पुराण वाटतसे सोपे । अनुभविता कापे जीव त्याचा ? ।
पोपटाची विद्या शिकूनिया फार । बोलतो सुंदर राघू जेसा ॥
अपरोक्ष काय जया ठावे नाही । भक्त कैसा होई प्राणी तो हो ? ॥
म्हणे तुकड्यादास व्यर्थ का मरसी ? । सोडोनिया देशी नम्रतेला ।।