काय हे करिसी सॉंग रे शहाण्या ?
काय हे करिसी सोंग रे शहाण्या ? । नरजन्मा प्राण्या ! येवोनिया ॥
जावोनि दाढी नेत्र ते लाविसी । परस्त्री भोगिसी सुखरूप ।।
पोटासाठी शिष्य करोनी बहुत । लुटाया जगात आले तुम्ही ॥
तुकड्यादास म्हणे साधा रे ! साधन । जेणे जन्ममरण तुटे त्वरे ॥