जरी कोणी केले काव्य ते कितीही
जरी कोणी केले काव्य ते कितीही । तरी का लवलाही राम भेटे ? ॥
फिरती ते मौनी जटा वाढवोनी । लावी निशिदिनी कोणी भस्म ॥
तयालागी शोध लागे ना तत्त्वता । परंतु पाहता सहज दिसे ।
तुकड्यादास म्हणे सोपा रे ! उपाय । रामनामी सोय धरी वेगी ।।