तपस्वी ते ऐसे म्हणावीती मोठे
तपस्वी ते ऐसे म्हणविती मोठे । लागताती पेठे प्रपंचाच्या ॥
न निघेचि मन बाहेरी अजूनी । सांगतसे जनी ज्ञानवार्ता ॥
अंतरीचा लोभ न सुटे सर्वथा । जाऊ म्हणे तीर्था, कासयासी ? ॥
तुकड्यादास म्हणे आचरणाविण । प्राण्याचे तरण केवि होय ? ॥