अष्टसिद्धी, चौदा विद्या ज्यासि पाठ
अष्टसिद्धी, चौदा विद्या ज्यासी पाठ । आणिक चौसष्ट कला त्यात ॥
सहा शास्त्रे, वेद, अठराही पुराणे । असती प्रसन्न जया नरा ॥
तयासही संत न म्हणे रे ! कोणी । भरती ते पाणी चौऱ्यांशीत॥
तुकड्यादास म्हणे अपरोक्षाविना । जरी तो शहाणा, मूर्ख झाला ।।