वकील ते ऐसे बहुत ची गेले

वकील ते ऐसे बहुतचि गेले । न्याय सत्य केले नाही ज्यांनी ॥
सत्य म्हणजे काय न कळे वकीला । लुटायासी झाला वेषधारी ॥
वकील पदवी ऐसियास द्यावी । पाही जो बरवी नित्यानित्य ॥
तुकड्यादास म्हणे सत्य काय आहे । निशिदिनी पाहे तोचि संत ॥