शरीरी उदास नाही कोठे प्रेम

शरीरी उदास, नाही कोठे प्रेम । हृदयी आत्माराम डोलतसे ।
निजभावे सदा भजन ते करी । देहाचे बाहेरी चिन्ह पडे ॥
जगत हे मिथ्या वाटतसे ज्यास । तोचि संत खास शोधावा हो ! ॥
म्हणे तुकड्यादास विषय ते पाच । रुतती जैसे काच तया नरा ॥