जयाचे हृदयी वसे नारायण

जयाचे हृदयी वसे नारायण । त्याने यज्ञदान केवी कीजे ? ॥
परीस तो जरी मिळालासे घरी । धनाची हांडोरी गाडे केवी ? 
हदयी प्रकाश पड़े ब्रह्मयाचा । कामक्रोध त्याचा गुण काय ? ॥
म्हणे तुकड्यादास ब्रह्म जो जाणेल । तयाचे का बोल व्यर्थ जाती ? ॥