जगी प्राणी झाला योगभ्रष्ट जरी

जगी प्राणी झाला योगभ्रष्ट जरी । तयासी अवधारी जन्म मिळे ।
येवोनिया जन्मा करी काम साध्य । प्राणी तो हो! बद्ध होत नाही ॥
म्हणोनिया पय्या साधावा त्वरीत । सद्गुरु चरणात लीन व्हावे ॥
तुकड्यादास म्हणे शिक्षक जे भक्त । होतील आसक्त गुरुविणा ॥