जिथे संदेह ओसरे l समूळ द्वैत ते निरवारे
जेथे संदेह ओसरे । समूळ द्वैत ते निरवारे ।।
मिटले संदेह हे सारे । तोचि संत मानिती ॥
जरी झाला ब्रह्मज्ञानी । सोडू नये कर्म पाणी ॥
मनी विश्वास ठेवोनी । शरण जावे संतासी ॥
ऐसी भक्ती हो करिता । पावे मोक्षासी तत्त्वता ॥
तुकड्यादास बोले त्राता । पांडुरंगचि करी ॥