सोडुनीया चाल धर्म नीती सारी

सोडोनिया चाल धर्म-नीति सारी । भ्रष्टाकार करी तोही नर ॥
आनंदाने नाम घेतसे अपार । करी जयजयकार तोही नर ॥
वश केला ज्याने प्रभू रघुराणा । ठेवितो धारणा तोही नर ॥
तुकड्यादास म्हणे माझे-माझे करी । यमपुरी भोगी तोही नर ॥