आसक्त शरीरी ऐसा जो का नर

आसक्त शरीरी ऐसा जो का नर । तया सारंगधर तुच्छ मानी ॥
वाटे ऐसे ज्यास व्हावे माझे बरे । तया सारंगधरे थोर   केले ॥
वाईट ती येई पुढे त्यासी स्थिती । नर्कही भोगिती सत्य जाण ॥
तुकड्यादास म्हणे निष्कामावाचून । कधी मोक्ष जाण न मिळेचि ॥