जयासाठी नरदेह हा निर्माण

जयासाठी नरदेह हा निर्माण । तेचि रे ! कारण सोडियले ।।
धरियली गोडी विषयांची फार । पुढे फरफर यम ओढी ॥
निती ती सोडोनि अजाती मिळाले । ब्रह्मरूप झाले काय तुम्ही ? ॥
म्हणे तुकड्यादास बहू फेरा होतो । तेव्हा जीव येतो नरदेही ।॥