येवोनी या काय केले रे ! जन्मासी ?
येवोनिया काय केले रे ! जन्मासी ? । व्यर्थ त्वा पित्यासी कष्टविले ॥
केला सुखे वास मातचे उदरी । निघता बाहेरी मारी तिसी ।
सोडोनिया मंत्र सोह चा सुंदर । कोहं निरंतर गातो प्रेमे ।।
तुकड्यादास म्हणे बनलासे घोडा । आयुष्याचा धोंडा केला प्राण्या ! I।