घडी घडी वेळ जातसे निघोनी

घडीघडी वेळ जातसे निघोनी । केव्हा करी प्राणी साधन हो ? ॥
वय शंभराचे नेमिले नरदेही । तेही होत पाही थोडे-बह ॥
काया तो योग न मिळेचि वेळ । पुढे करील काळ काय स्थिती ? ॥
मज वाटे देवा ! पाहुनी ही सोंगे । तुकड्यादासा वेगे तारी गा ! तू ॥