करा रे विचार सत्यासत्य यांचा

करा रे विचार सत्यासत्य यांचा । खेळ हा मायेचा सांडोनिया ।
तरीच ती मुक्ती लाभेल तुम्हासी । ब्रह्माचे पदासी जाल त्वरे ।। नाहीतरी काय केले ते साधन ? । व्यर्थ नरतनु गेली वाया ।। म्हणे तुकड्यादास नर नारायण । कर्तव्य करोन होई त्वरे ।