जो जीवा व्यर्थ मारी l बहु दुष्ट तो दरिद्री

जो जीवा व्यर्थ मारी । बहू दुष्ट तो दरिद्री ॥
तैसा पापी नाही कोणी । केली आयुष्याची हानी ॥
जन्मोजन्मीचे संचित । जीवा मारिल्या अहित ॥
तुकड्या म्हणे आत्मा काय । नाही नाही धरली सोय ॥