खावोनिया घरी मिष्ठान्न बहुत

खावोनिया घरी मिष्टान्न बहुत । म्हणे देवा ! अंत पाहसी काय ? ।।
तूप- कढी- भात- वरण- चटणी । नाही शुद्ध वाणी रामनामी ॥
दीन जरी झाला मारी त्यासी लाथ । श्रीमंतासी हात देई त्वरे ।
केवी तो गोपाळ पावे तुज गड्या ? । म्हणे हो तुकड्या, शुक बोले ।।