संचिताप्रमाणे वासना उपजे

संचिताप्रमाणे वासना उपजे । न येती रे ! काजे अंती कोणी ॥
मातीसी हा थाट करोनिया काय ? । मिळोनिया जाय माती मध्ये ॥
सुंगधी अत्तर लावियले जरी । गोवऱ्यांचे वरी निजसी पुढे ॥
तुकड्यादास म्हणे काय हे करिसी ? । वाट तू चालसी यमाची रे ! ॥