शतक वर्षां मध्ये करी रे ! साधन
शत वर्षा मध्ये करी रे ! साधन । न पुरते जाण तेही होती ।
वर्षे ती पन्नास झोपेमाजी जाती । पंचवीस बुडती अज्ञानात ॥
पुढे तो म्हातारा, उठवेना जागी । पंचेवीस भोगी पडशात ? ॥
तुकड्यादास म्हणे रिघ ना साधना । मूती आणी ध्याना सद्गुरुची ॥