संताचीये पायी शरण जव जासी

संतांचिये पायी शरण जव जाशी । तुटेल चौऱ्यांशी - भोग नर ! ॥
नलगे सायास दुःख काही बापा ! । मार्ग जाण सोपा वैकुंठाचा ॥
जरी योगयागे सिद्धी मिळविसी । तरी ना तरशी गुरुविणा ।
शतवर्षामध्ये करी रे ! साधन । तुटेल बंधन तुकड्या म्हणे ॥