आतातरी प्राण्या ! होई रे सावध
आता तरी प्राण्या ! होई रे सावध । नामस्मरण- नाद सोडू नको ॥
चौ-यांशी भोगिता काया ही मिळाली । तेही व्यर्थ गेली पुढे काय ? ॥
न मिळे रे सोय सद्गुरुवाचूनी । त्वरे लागे चरणी संतांच्या बा ! ॥
तुकड्यादास म्हणे सांगतो ती खूण । जाई जाई शरण सद्गुरुला ।।