उघडी झापड काय रे ! पाहसी ?

उघडी झापड काय रे ! पाहसी ? । रूप अविनाशी पाही आता ॥
धरुनिया मार्ग सत्य शोधण्याचा । रामनामे वाचा वद बापा ॥
नीतीने चालणे हाचि नर-धर्म । याविण ते कर्म काही नाही ॥
तुकड्यादास म्हणे स्वहीत-साधन । सद्गुरुवाचून न होयचि ॥