ज्याचे अंतकरणि प्रेम l तोची वदे रामराम

ज्याचे अंतःकरणी प्रेम । तोचि वदे रामनाम ॥
ज्यासी माया-लोभ वाटे । नाम घेता येती काटे ।
ज्यासी सुसंगति मिळाली । त्याची मती पालटली ।।
तुकड्या म्हणे ये वैराग्य । चरण धरील आरोग्य ।।