घेई वैराग्याचा बोध l करी विषय निरोध

घेई वैराग्याचा बोध । करी विषय-निरोध ।॥
हेचि तुझी उपासना । आणी गुरु सदा ध्याना ॥
हेचि तुझे संध्यास्नान । चरणी ठेवी मानपान ।।
तुकड्या सांगे रे उपाय । आता तरी धरी सोय ॥