जरी मुखी घेसी नाम

जरी मुखी घेशी नाम । ठेवी हृदयात प्रेम ।।
आनंद तो ठेवी आत । संत-चरण हृदयात ।।
मुखी रामकृष्ण म्हण । जरी असे शहाणपण ॥
तुकड्या म्हणे तन-मन । करी गुरुसी अर्पण ।