व्यापार हा झाला संत पोशाखाचा
व्यापार हा झाला संत-पोषाखाचा ।
आम्हांसी तयाबा विट आला ॥
वर्म कोणी नेणे धर्म कोणी नेणे ।
पोटासाठी गाणें गाती साधू ॥
जग जरी नर्की पड़े आड़ राने ।
तरी दया नेणे साधू कोणी ॥
तुकड्यादास म्हणे ऐसा नव्हे संत ।
आपुला आघात लोकी टाकी ॥